HSRP : राज्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा; HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर
राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र वाहन मालकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता ही अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.