• Download App
    HSC Board Exam Mass Copying 2026 | The Focus India

    HSC Board Exam Mass Copying 2026

    Dada Bhuse : 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; दोषी पर्यवेक्षकांसह केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा संताप

    राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर खुद्द अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना चक्क कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे तसेच दोषी पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    Read more