India Census 2027 : जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान होईल, सरकार घरांची यादी आणि माहिती गोळा करेल
केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सांगितले की, देशात होणाऱ्या 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडेल. याची सुरुवात घरांची यादी तयार करणे आणि घरांचा डेटा गोळा करण्यापासून होईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या येथे 30 दिवसांत हे काम पूर्ण करतील.