PM Modi : पीएम मोदींनी जिनपिंग यांच्या आवडत्या ‘रेड फ्लॅग’ कारमधून प्रवास केला; चीनच्या राष्ट्राध्यक्षांची अधिकृत कार
चीनमधील तियानजिनमध्ये पंतप्रधान मोदींना प्रवासासाठी ‘होंगकी एल५’ ही खास कार देण्यात आली आहे. या कारला चीनची रोल्स रॉयस म्हणतात. पंतप्रधान शी जिनपिंग स्वतः ही कार वापरतात. एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी सोमवारी या कारमधून पोहोचले.