Trump : ट्रम्प अमेरिकेच्या राजधानीतून सर्व बेघरांना बाहेर काढणार; म्हणाले- कोणतीही उदारता दाखवणार नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमधील बेघर लोकांना तात्काळ राजधानी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीच्या समस्येला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया साइटवर लिहिले की, बेघर लोकांना ‘तत्काळ’ राजधानीतून बाहेर पडावे लागेल. बेघरांना राहण्यासाठी जागा दिली जाईल, परंतु ती जागा राजधानीपासून खूप दूर असेल.