Home Ministry : डिजिटल अरेस्ट प्रकरणांत 83,668 व्हॉटसअॅप खाती बंद; गृह मंत्रालयाने दिली माहिती
गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत सांगितले की, सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 3,962 हून अधिक स्काईप आयडी आणि 83,668 व्हॉटसअॅप अकाउंटची ओळख पटवली आहे आणि ते ब्लॉक केले आहेत. आय4सी ही सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाची एक विशेष शाखा आहे.