Home Affairs Kadam : गृह राज्यमंत्री कदम यांच्या वक्तव्यावरून वाद; तरुणीने आरडाओरड, विरोध केला नाही म्हणून आरोपीने अत्याचार केला
स्वारगेट येथे बसमध्ये तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणाले की, तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व नव्या एसटी बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा केली.