हिंजवडीचं लवासा झालंय का??; पुतण्यानेच काकांच्या विकासाच्या दृष्टीचे वाभाडे काढले का??
हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली. प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय.