OBC Protest : हैदराबाद गॅझेटियर जीआर रद्द करा; ओबीसींचा हिंगोलीत मोर्चा; राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
राज्य शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समााजाच्या वतीने बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मराठवाड्यातून ओबोसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.