Jitan Ram Manjhi : मांझी यांनी 11 नेत्यांना पक्षातून काढून टाकले, या यादीत राष्ट्रीय सचिवांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंतचा समावेश
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) ने त्यांच्या ११ नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश कुमार पांडे यांनी याबाबत एक पत्र जारी केले.