Mohan Bhagwat : हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे खडे बोल- कितीही टेरिफ लावा, आम्ही आत्मनिर्भर होऊ
काही देश आपल्या व्यापारावर टेरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, आम्ही कुणाच्याही दबावाखाली काम करणार नाही, तुम्ही कितीही टेरिफ लावा, आम्ही आत्मनिर्भरतेच्या रस्त्याने जाणार आहोत, ज्यामुळे आमच्या देशात रोजगार मिळेल. विदेशातील रोजगार टाळण्याची चिंता आम्ही करणार नाही, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली.