Navneet Rana : हिंदूंनी किमान 3 ते 4 मुले जन्माला घालावीत!; मौलानांच्या ’19 मुलां’च्या विधानावर नवनीत राणांचा जोरदार पलटवार
एका मौलानाने त्यांना 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सांगितले होते. यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 19 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन-चार-चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे राणा यांनी म्हटले आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सणीतले होते. यावरून राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.