Hindu-Muslim : पाकिस्तानात होळी खेळल्याने हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांविरुद्ध FIR; विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस, प्रवेशावर बंदी
पाकिस्तानातील कराची येथील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात होळी खेळल्याबद्दल हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ फेब्रुवारी रोजी दोन्ही समुदायातील काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळीचा सण साजरा केला. याचे काही व्हिडिओही समोर आले.