Changur Baba : छांगूर बाबा हिंदू मुलींना मुस्लिम देशांमध्ये पाठवायचा; पीडितेकडून बलात्काराचा आरोप
छांगूर बाबाने माझे धर्मांतर केले. त्याच्या साथीदारांनी सहारनपूर, बलरामपूर आणि कर्नाटकमध्ये माझ्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. मी सहारनपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु छांगूरच्या दबावाखाली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. छांगूर बाबाचे सौदी अरेबियात ५०० हून अधिक एजंट आहेत.