Governor : राज्यपालांचा रोकडा सवाल- मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर लगेच मराठी बोलता येईल का?
मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा खडा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी – अमराठी वादावर भाष्य करताना उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर विशेषतः ठाकरे बंधूंवर होता हे स्पष्ट आहे.