Fadnavis : एखाद्याला भेटले म्हणजे युतीसाठी भेटणे नाही; CM फडणवीस यांचे उद्धव ठाकरे भेटीवर स्पष्टीकरण
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक करत टोलेबाजी देखील केली. यावेळी सभागृहात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तिकडे स्कोप नाही पण इकडे आहे, तुम्ही येऊ शकता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले.