Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान
गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.