काँग्रेसच्या लोकसभेतल्या उपनेत्याचे पाकिस्तान कनेक्शन; आसाम सरकारच्या हाती SIT चा अत्यंत स्फोटक रिपोर्ट!!
काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई आणि त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान कनेक्शन किती गहिरे आणि किती घातक आहे, यासंबंधीचा अत्यंत स्फोटक रिपोर्ट आसाम सरकारच्या हाती आला असून तो लवकरच जनतेसाठी प्रकाशित करण्याची खात्री मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आज दिली.