Himachal Bus Tragedy : हिमाचलमध्ये बसवर डोंगरावरून ढिगारा कोसळला; 15 जणांचा मृत्यू, 2 मुलांना वाचवले
मंगळवारी संध्याकाळी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एका प्रवासी बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. वृत्तसंस्था पीटीआयने १८ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे, तर पोलिस अधीक्षकांनी १५ जणांची पुष्टी केली आहे. बसमध्ये अडकलेल्या दोन मुलांना वाचवण्यात आले. अपघातानंतर लगेचच एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक रहिवासी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.