Narges Mohammadi : इराणमध्ये नोबेल विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना अटक; हिजाब न घालता भाषण देत होत्या
इराणमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या नरगिस मोहम्मदी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. नरगिस मशहद शहरात कार्यकर्ते खोसरो अलिकोरदी यांच्या शोक सभेत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या, तिथे त्यांना पकडण्यात आले.