Historic changes in GST : जीएसटीमध्ये ऐतिहासिक बदल: सामान्यांना दिलासा, महागड्या वस्तूंवर अधिक कर
मोदी सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वस्तू आणि सेवा करात (GST) मोठा बदल जाहीर केला आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेले दोन स्लॅब रद्द करून आता कररचना अधिक सोपी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना थेट दिलासा मिळणार आहे.