Nylon Manja : नायलॉन मांजावर हायकोर्टाची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; वापरणाऱ्यांना 50 लाखांचा तर विक्रेत्यांवर अडीच लाखांच्या दंड!
देशभरात सर्वत्र मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संक्रांत सण जवळ आला की आकाशात पतंगांची अक्षरशः गर्दी दिसायला लागते. मात्र, हा पतंग उडवण्यासाठी नायलॉन दोऱ्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढला असून यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे देखील चिरल्याच्या घटना घडत आहेत. या नायलॉन मांजाच्या विरोधात नागरिकांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.