द फोकस एक्सप्लेनर: कोण आहे काँग्रेस हायकमांड? खरगे आणि राहुल गांधी यांच्या विधानांमध्ये दडलंय उत्तर
स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरू कुटुंबाचा काँग्रेसवरील प्रभाव दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दशकांमागून दशके तो वाढतच गेला. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या निधनानंतर आणि त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांसाठी हा प्रभाव थोडा कमी झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब होते.