Hemant Biswa Sarma : इस्लामिक देशांतील ‘हँडलर’ काँग्रेसच्या प्रचारासाठी सक्रिय; ५ हजार सोशल मीडिया खात्यांमागे विदेशी हात? मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी एक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इस्लामिक देशांतील काही ‘हँडलर’ काँग्रेसच्या समर्थनार्थ ५ हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्स चालवत आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणा या प्रकाराची चौकशी करत आहेत, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.