China : चिनी राज्यात 24 तासांत वर्षभराइतका पाऊस; रस्ते-घरे पाण्याखाली, रेड अलर्ट जारी; 19 हजार लोकांचे स्थलांतर
उत्तर चीनमधील बाओडिंग शहरात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४४८.७ मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरी वर्षभराच्या पावसाइतकी (५०० मिमी) आहे. मुसळधार पावसामुळे औद्योगिक शहरात पूर आला, रस्ते पाण्याखाली गेले, पूल आणि रस्ते तुटले आणि काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी बाओडिंगमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.