Nanded : नांदेडमध्ये शेतकऱ्याने फोडली तहसीलदारांची गाडी; सरकारच्या पॅकेजमधील अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने संताप अनावर
राज्य सरकारने घोषित केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचा एक छदामही न मिळाल्यामुळे संतप्त एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने थेट तहसीलदारांची गाडी फोडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शेतकऱ्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे