Hasan Mushrif : मुश्रीफांचा महाडिक-क्षीरसागर यांना टोला; आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, आम्ही लंडनवारीमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत. एकाने 80 जागा घेतल्या तर दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या.