Harvard university : हार्वर्डमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदीचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय अमेरिकन न्यायालयाकडून रद्द, भारतीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा
हार्वर्ड विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा अधिकार रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या वादग्रस्त निर्णयावर अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरती स्थगिती दिली, या निर्णयामुळे जगभरातील सुमारे ७,००० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात आले होते. हजारो भारतीय विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे.