• Download App
    harshwardhan sapkal | The Focus India

    harshwardhan sapkal

    Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांची सावरकरांवर आक्षेपार्ह टीका; म्हणाले- गांधीहत्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता

    महात्मा गांधीजींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता आणि नथुराम गोडसे हाच पहिला दहशतवादी होता,’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही अप्रत्यक्ष आणि आक्षेपार्ह टीका करत, ‘गांधी हत्येच्या कटातील सहआरोपी ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारा होता,’ असा गंभीर आरोप केला आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. दरम्यान, या कार्यक्रमावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे.

    Read more

    Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.

    Read more

    मोदींच्या रिटायरमेंट वरून अनेक खुलासे + प्रतिखुलासे, तो विषयही गुंडाळला बासनात; पण आता त्यावरून हर्षवर्धन सपकाळांचे स्वप्नरंजन!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंट वरून अनेक खुलासे + प्रतिखुलासे झाले. तो विषय देखील राजकीय वर्तुळाने आणि माध्यमांनी बासनात गुंडाळून टाकला.

    Read more

    रेस मधली चार बडी नावे बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!!

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी काँग्रेसमधलीच चार बडी नावे समोर आली होती.

    Read more