• Download App
    Harshvardhan Sapkal | The Focus India

    Harshvardhan Sapkal

    Harshvardhan Sapkal : शिवरायांची टिपूशी तुलना करणाऱ्या सपकाळांचा 72 तासांनी माफीनामा; म्हणाले, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो

    छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच टिपू सुलतानचे शौर्य होते, अशी थेट तुलना करणाऱ्या वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांनंतर माफी मागितली आहे. काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.

    Read more

    Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक; तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

    कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावर आता मराठा ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर येथील समन्वयक महेश डोंगरे यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.

    Read more

    टिपू सुलतानची तरफदारी करून हर्षवर्धन सपकाळांनी मोदींच्या वक्तव्यातले सत्यच तर सिद्ध केले!!

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यातले सत्य तर सिद्ध केले, तरी त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला.

    Read more

    Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांचे वादग्रस्त विधान- टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले जावेत!

    कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त विधान करत महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

    Read more

    BMC Elections : काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर; जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

    काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे.

    Read more

    BMC Elections : मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले, काँग्रेसच्या स्थापनादिनी युतीची घोषणा

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Harshvardhan Sapkal : मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे ‘जर-तर’च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Harshvardhan Sapkal : काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता असेल तरच युती शक्य, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला मनसेसोबत युतीबाबत संभ्रम

    समविचारी पक्ष आणि काँग्रेसच्या मूल्यांना आदर देणारे पक्ष असतील, तरच काँग्रेस त्यांच्यासोबत युती करेल,” असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त करत राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे संकेत दिले आहेत.

    Read more

    Harshvardhan Sapkal’ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?

    पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यात घडणाऱ्या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली आहे.

    Read more

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा

    बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे

    Read more

    Harshvardhan Sapkal रडायचे नाही, लढायचे, काँग्रेस विचार घराघरात पोहोचवू: हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

    आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे.

    Read more