Harshvardhan Jadhav : हर्षवर्धन जाधवांना ‘तो’ कारनामा चांगलाच भोवला
पोलिस अधिकाराच्या कानशिलात लगावणं शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना चांगलंच महागात पडलं आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अखेर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.