Harmony agreement : उद्योग अन् शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्य सुनिश्चित करणारा सामंजस्य करार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे मायनिंगचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ऐतिहासिक करारानिमित्त उपस्थितांशी संवाद साधला.