Haribhau Bagde : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातामधून थोडक्यात बचावले!
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोठी दुर्घटना टळली. शनिवारी (२९ मार्च) राज्यपाल ज्या हेलिकॉप्टरने पाली येथे आले होते, त्या हेलिकॉप्टरमध्ये परतीच्या प्रवासादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर सुमारे २५ फूट उंचीवर असताना अचानक स्फोट झाला आणि त्यातून धूर येऊ लागला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली.