Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांचे अकाउंट हॅक; एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे, 45 मिनिटांत मिळवले नियंत्रण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाउंट रविवारी सकाळी हॅक झाले होते. हॅकर्सनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तान आणि तुर्कीच्या झेंड्यांचे फोटो पोस्ट केले होते. शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ सायबर क्राइम पोलिसांना कळवले. तक्रार मिळाल्यानंतर 30 ते 45 मिनिटांत त्यांनी अकाउंटवर नियंत्रण मिळवल्याचे त्यांच्या पथकाने सांगितले आहे.