PM Modi : PM म्हणाले- मोदी काँग्रेसच्या चुका सुधारत आहेत; काँग्रेसने व्होट बँकेसाठी घुसखोरांना सूट दिली, आम्ही त्यांना ओळखून बाहेर काढत आहोत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुवाहाटी येथे सांगितले की, काँग्रेसने नेहमीच आसामविरोधी काम केले. काँग्रेसने व्होट बँकेसाठी घुसखोरांना मोकळीक दिली आणि येथील लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) बदलले. यामुळे संपूर्ण आसामची सुरक्षा आणि ओळख धोक्यात आली.