Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न; वाहनाची काच फुटली, जालन्यात ओबीसी आंदोलनाला जाताना घडला प्रकार
मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार टीका करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आज जालन्यात काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आंदोलकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.