Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे मुंबईत आलेच तर जेलमध्ये जावे लागणार; गुणरत्न सदावर्तेंचा दावा
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाचा हा निर्णय येताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत जरांगेंवर टीका केली आहे. तसेच ते मुंबईत आले तर जेलमध्ये जावे लागणार, असा दावा देखील सदावर्ते यांनी केला आहे.