Gujarat : गुजरातेत एक हजाराहून अधिक बांगलादेशी ताब्यात; हरियाणात 460 पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावण्याचे आदेश
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील परदेशी नागरिकांवर कारवाई सुरू झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद (८९०) आणि सुरत (१३४) येथे पोलिसांनी शनिवारी महिला आणि मुलांसह सुमारे एक हजार बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेतले. जर वैध कागदपत्रे सापडली नाहीत, तर त्यांना भारतातून हद्दपार केले जाईल.