Mother Dairy : मदर डेअरीची दुधाच्या किमतीत 2 रुपयांची कपात; पनीर आणि बटरही स्वस्त; GST कपातीचा परिणाम
मदर डेअरीने मंगळवारी (१६ सप्टेंबर) त्यांच्या अनेक दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली. जीएसटी दरांमध्ये अलीकडेच कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उत्पादन आणि पॅकेजिंगनुसार उत्पादनांच्या किमती 2 रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.