GST collection : केंद्राचे मार्चमध्ये 1.96 लाख कोटी रुपयांचे GST कलेक्शन; वार्षिक आधारावर 9.9% जास्त
मार्च २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा करातून (GST) सरकारने १.९६ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर त्यात ९.९% वाढ झाली आहे. मंगळवार, १ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०२४ मध्ये सरकारने १.७८ लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा केला होता.