Denmark : सक्तीच्या नसबंदी प्रकरणी डेन्मार्कच्या PMनी मागितली माफी; 60 वर्षांपूर्वी महिलांना जबरदस्ती गर्भनिरोधक उपकरणे लावण्यात आली होती
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी बुधवारी ग्रीनलँडमधील महिलांची ६० वर्षांपूर्वी जबरदस्तीने केलेल्या नसबंदीबद्दल माफी मागितली. ग्रीनलँडमध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्देशाने करण्यात आलेल्या नसबंदीला आता वांशिक भेदभावाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे, ज्याचे स्वतःचे पंतप्रधान आहेत.