Sahar Sheikh : ‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा; ‘मुंब्रा हिरवा’ करण्याची केली होती वल्गना; वाद होताच पोलिसांकडे मागितली माफी
ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात सहर शेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.