Delhi Air Pollution : दिल्लीची हवा विषारी, हंगामात पहिल्यांदाच GRAP-IV लागू; बांधकाम पूर्णपणे बंद
दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शनिवार संध्याकाळपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) च्या स्टेज-IV मधील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने सकाळी येथे GRAP-III चे निर्बंध लागू केले होते. GRAP-IV हवा अत्यंत प्रदूषित (AQI 450 पेक्षा जास्त) झाल्यावर लागू केला जातो. याला ‘सिव्हिअर प्लस’ श्रेणी म्हटले जाते. शनिवारी संध्याकाळी दिल्ली-एनसीआरमधील आनंद विहारमध्ये AQI 488 आणि बवानामध्ये 496 पर्यंत पोहोचला होता.