Govind Pansare : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे हत्याकांडातील 6 आरोपींना 6 वर्षांनी जामीन
कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या ६ आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केला जात असल्याचे हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी म्हटले आहे.