Govind Giri Maharaj : आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित होण्याची भीती; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भाजपच्या आयात संस्कृतीवर टीका
अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली आहे. यामुळे नाल्यांमुळे जशी गंगा प्रदूषित झाली आहे, तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.