Mamata Banerjee : ममता बॅनर्जींनी सोशल मीडिया प्रोफाइल बदलली; संस्थापक अध्यक्षा अ.भा.तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगाल CM, 15वी, 16वी, 17वी विधानसभा असे केले
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर शनिवारी सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये बदल केला. ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल फेसबुकवर शनिवारी बायोमध्ये दिसत आहे- संस्थापक अध्यक्षा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (15वी, 16वी, 17वी विधानसभा).