PM Kisan : PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला येणार; पंतप्रधान मोदी वाराणसीतून जारी करणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जारी केला जाईल. पीएम किसानच्या अधिकृत एक्स खात्यातून याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून २० वा हप्ता जारी करतील. शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी २०००-२००० रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो.