Government : पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास मंजुरी, शासन निर्णय जारी
मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत करता येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला.