CJI Bhushan Gavai ; निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते.