Manoj Jarange : आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस; भावना व्यक्त करताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचे कल्याण झाले. हा माझ्या समाजासाठी सुवर्णक्षण असून आज दिवाळी साजरी करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठीचा शासन निर्णय आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तसेच यावेळी मनोज जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.